सूचना दि. 30.01.2016
सर्व आहरण व
संवितरण अधिकारी यांना सूचित करण्यात येते की राष्ट्रीय निवृत्तीवेतन
योजनेंतर्गत कर्मचा-यांच्या माहितीचा फॉर्म एस-1 हा नमुना मे. एनएसडीएल यांचेकडून स्विकारणे बंद होत असून
त्याऐवजी CSRF 1 हा सुधारित नमुना माहे 1 फेबु्रवारी 2016 पासून लागू होत आहे.
त्यामुळे
कोशागाराकडून दिनांक 1 फेबु्रवारी 2016 पासून जुन्या स्वरुपातील फॉर्म एस-1 स्विकारले जाणार नाही, याऐवजी CSRF 1 या सुधारित
नमुन्यातीलच फॉर्म स्विकारल्या जातील याची नोंद घ्यावी.
राश्ट्रीय
निवृत्तीवेतन योजनेतील नोंदणीबाबतचा नवीन CSRF 1 हा सुधारित नमुना
सर्व कार्यालयांचे ई मेल पत्यावर पाठविण्यात येत आहे. त्यानुसार कार्यवाही करण्यात
यावी.
आदेषान्वये
जिल्हा
कोशागार कार्यालय
नागपूर