संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांना कळविण्यात येते की राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेतील सभासदांकरीता नागपूर कोषागाराकडून एनपीएस मार्गदर्शन कार्यशाळा दिनांक 15/07/2016 रोजी मा. सहसंचालक लेखा व कोषागारे, लेखा कोष भवन, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, नागपूर येथील प्रशिक्षण हाॅल मध्ये प्रथम सत्र सकाळी 10.30 वाजता व दुसरे सत्र दु. 2.30 वा.आयोजित करण्यात येत आहे.
सदर शिबीरास मे. एनएसडिएल यांचे प्रतिनीधीकडून सविस्तर मार्गदर्शन करण्यात येईल. तरी जास्तीत जास्त संख्येने सभासदांनी कार्यशाळेत उपस्थित रहावे.
कोषागार कार्यालय नागपूर