राष्ट्रीय निवृत्तीवेतन
योजनेअंतर्गत जमा रकमेचा परतावा मिळण्याबाबत
आहरण व संवितरण अधिकारी करिता महत्वाच्या सूचना
शासन निर्णय वित्त विभाग दि.06.04.2015 अन्वये राश्ट्रीय निवृत्तीवेतन योजना
दि.01 एप्रिल 2015 पासून कार्यान्वीत झालेली आहे. त्याअन्वये, सर्व आहरण व संवितरण
अधिकारी यांना सूचित करण्यात येते की ज्या कार्यालयातील राश्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत
कर्मचारी नियत वयोमानानुसार सेवानिवृत होत आहेत किंवा होणार आहेत अषा
कर्मचा-यांचे अंशदान रकमेच्या परताव्याचे प्रस्ताव; (Exit withdrawal) NSDL प्रणालीमार्फत तयार करुन
कोषागार कार्यालयास सादर करतांना आहरण व संवितरण अधिकारी यांनी
खालीलप्रमाणे कार्यवाही करणे आवष्यक आहे.
·
सेवानिवृत्त होणा-या अधिकारी / कर्मचा-यांचे PRAN Kit कोषागाराकडून प्राप्त झाल्याची खात्री
करुन घ्यावी.
- सेवानिवृत्त होणा-या अधिकारी/ कर्मचा-यांस सेवानिवृत्तीच्या दिनांकापासून 6 महिन्याचे अगोदर परतावा Claim id पक बाबतची माहिती मोबाईल/ ई-मेल वर प्राप्त होईल. सभासदाने सदर परतावा Claim id बाबत आहरण व संवितरण अधिका-यास कळवावे. सदर प्रकरणी कार्यालयानी परताव्याचे प्रस्ताव तयार करावे.
- परतावा प्रस्ताव अचूकरित्या तयार करणे संबधी PFRDA यांचे परिपत्रक दि.12.11.2015 तसेच मे. एन.एस.डी.एल. यांचे परिपत्रक दि.18.11.2015 वाचावे. सदर परिपत्रके www.cra-nsdl.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- आहरण व संवितरण अधिकारी यांनी सेवानिवृत्त होणा-या अधिकारी/ कर्मचारी यांचे वेतनदेयकामधून अंषदानाची कपात 3 महिन्यापूर्वी बंद करावी.
- सेवानिवृत्त होणा-या अधिकारी/ कर्मचारी यांचे प्रस्ताव (नमुना 102 GS) मध्ये तयार करुन त्यामधील जोडपत्र 4 मध्ये नमुद असलेल्या पुराव्यांची (KYC) पडताळणी करण्याची प्राथमिक जबाबदारी आहरण व संवितरण अधिकारी यांची राहील. (उदा. कर्मचा-यांचा वैयक्तीक तपशिल, वारसदाराची माहिती, बॅंक खाते क्रमांक इ.)
- सदर प्रस्तावास आहरण व संवितरण अधिकारी यांनी खालीलप्रमाणे आवष्यक प्रमाणपत्र जोडावे.
- o सभासदावर कोणतेही न्यायालयीन प्रकरणे/चैकषी प्रलंबित नाही याबाबतचे नाहरकत प्रमाणपत्र,
o कोणतीही थकबाकी प्रलंबित
नाही याबाबतचे नाहरकत प्रमाणपत्र,
o सभासदास परताव्याची रक्कम
प्रदान होण्याबाबतचे नाहरकत प्रमाणपत्र,
- सदर परताव्याचे प्रस्ताव आहरण व संवितरण अधिकारी यांनी स्वाक्षरी करुन वरील नमुद जोडपत्रासह कोशागार कार्यालयास सादर करावे.
राश्ट्रिय निवृत्तीवेतन
योजनेअंतर्गत कर्मचारी / सभासद यांनी परताव्या प्रकरणी खालीलप्रमाणे कार्यवाही
करणे अनिवार्य आहे.
- सेवानिवृत्त होणा-या अधिकारी/ कर्मचा-यांस सेवानिवृत्तीच्या दिनांकापासून 6 महिन्याचे अगोदर परतावा Claim id बाबत मोबाईल/ई मेल वर माहिती प्राप्त झाल्याची खात्री करण्यात यावी. जर सदरचे Claim id सभासदास प्राप्त नसल्यास कोशागाराषी संपर्क साधावे.
- सभासदास Claim id प्राप्त झाल्यानंतर www.cra-nsdl.com या संकेतस्थळावरुन स्वतःचे PRAN Kit वरील I-Pin द्वारे प्रणालीत प्रवेष करुन “Exit withdrawal request” अंतर्गत (Initiate withdrawal request) परताव्या बाबतची कार्यवाही सुरु करावी.
- सभासदाने Initiate withdrawal request या Withdrawal type (एकमुस्त किंवा टप्प्याने) व परताव्याची टक्केवारी (Percent of withdrawal) निवडावे.
- सभासदास होणा-या अंतिम प्रदान रक्कमे बाबतचा सविस्तर तपशील PFRDA यांचे परिपत्रक दिनांक 12.11.2015 मध्ये दिलेला आहे.
- Annuity Service Provider (ASP) यांची निवड करणे तसेच ASP SCHEME OPT यांची निवड करण्याची संपूर्ण जवाबदारी हि सभासदांची राहील. या विषयी अधिक माहिती www.cra-nsdl.com या संकेतस्थळावर subscriber's corner वर उपलब्ध आहेत.
- सभासदाने प्रणालीमध्ये भरलेल्या माहितीची खात्री करावी व अपूर्ण असलेली माहिती उदा. व्यवहाराचा पत्ता, बॅंकेचे खाते क्रमांक, वारसदाराची माहिती, मोबाईल क्रमांक व ई मेल आयडी इ. अद्यावत करण्याची जबाबदारी ही सभासदाची राहील.
- सभासदाने प्रस्तावासोबत जोडण्यात येणारे आवष्यक दस्तावेज/पुरावे ऑनलाईन प्रणालीतील Checklist मध्ये þ करावे. उदा. स्वतःचे ओळखपत्र, रहिवासी पत्ता/ पुरावा, बॅंकेचे रद्द केलेले धनादेश (Cancelled Cheque) इ.
- वरीलप्रमाणे सभासदाने प्रणालीमार्फत परताव्याची कार्यवाही पूर्ण करुन अंतिम Submit केल्यांनतर त्याला Acknowledgement id प्राप्त होईल.
- वरील कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर “View form and print withdrawal form” या पर्यायामार्फत सदर नमुन्याची/प्रस्तावाची प्रिंट घ्यावी.
- वरील परताव्याचे नमुन्यावर सभासदाने खालील प्रमाणे कार्यवाही करणे आवष्यक आहे.
o स्वतःचे
फोटो लावून त्यावर स्वाक्षरी करणे,
o सदर
माहिती (Declaration) प्रमाणित करुन त्यावर स्वाक्षरी करावी.
o साक्षीदाराची
स्वाक्षरी घ्यावी.
o Revenue stamp लावावे.
- सदर परताव्याचे प्रस्ताव आहरण व संवितरण अधिकारी यांनी स्वाक्षरी करुन कोशागार कार्यालयास सादर करावे.