Friday, 22 April 2016

राश्ट्रीय निवृत्तीवेतन योजनंेतर्गत जमा रकमेचा परतावा मिळण्याबाबत आहरण व संवितरण अधिकारी करिता महत्वाच्या सूचना


राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत जमा रकमेचा परतावा मिळण्याबाबत
आहरण व संवितरण अधिकारी करिता महत्वाच्या सूचना

शासन निर्णय वित्त विभाग दि.06.04.2015 अन्वये राश्ट्रीय निवृत्तीवेतन योजना दि.01 एप्रिल 2015 पासून कार्यान्वीत झालेली आहे. त्याअन्वये, सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांना सूचित करण्यात येते की ज्या कार्यालयातील राश्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत कर्मचारी नियत वयोमानानुसार सेवानिवृत होत आहेत किंवा होणार आहेत अषा कर्मचा-यांचे अंशदान रकमेच्या परताव्याचे प्रस्ताव; (Exit withdrawal) NSDL प्रणालीमार्फत तयार करुन कोषागार कार्यालयास सादर करतांना आहरण व संवितरण अधिकारी यांनी खालीलप्रमाणे कार्यवाही करणे आवष्यक आहे.
·        सेवानिवृत्त होणा-या अधिकारी / कर्मचा-यांचे PRAN Kit कोषागाराकडून प्राप्त झाल्याची  खात्री करुन घ्यावी.


  •      सेवानिवृत्त होणा-या अधिकारी/ कर्मचा-यांस सेवानिवृत्तीच्या दिनांकापासून 6 महिन्याचे अगोदर परतावा Claim id  पक बाबतची माहिती मोबाईल/ ई-मेल वर प्राप्त होईल. सभासदाने सदर परतावा Claim id बाबत आहरण व संवितरण अधिका-यास कळवावे. सदर प्रकरणी कार्यालयानी परताव्याचे प्रस्ताव तयार करावे. 
  •   परतावा प्रस्ताव अचूकरित्या तयार करणे संबधी PFRDA  यांचे परिपत्रक दि.12.11.2015 तसेच मे. एन.एस.डी.एल. यांचे परिपत्रक दि.18.11.2015 वाचावे. सदर परिपत्रके www.cra-nsdl.com  या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  •   आहरण व संवितरण अधिकारी यांनी सेवानिवृत्त होणा-या अधिकारी/ कर्मचारी यांचे वेतनदेयकामधून अंषदानाची कपात 3 महिन्यापूर्वी बंद करावी. 
  •   सेवानिवृत्त होणा-या अधिकारी/ कर्मचारी यांचे प्रस्ताव (नमुना 102 GS)  मध्ये तयार करुन त्यामधील जोडपत्र 4 मध्ये नमुद असलेल्या पुराव्यांची (KYC) पडताळणी करण्याची प्राथमिक जबाबदारी आहरण व संवितरण अधिकारी यांची राहील. (उदा. कर्मचा-यांचा वैयक्तीक तपशिल, वारसदाराची माहिती, बॅंक खाते क्रमांक इ.)
  •   सदर प्रस्तावास आहरण व संवितरण अधिकारी यांनी खालीलप्रमाणे आवष्यक प्रमाणपत्र जोडावे.
  • o सभासदावर कोणतेही न्यायालयीन प्रकरणे/चैकषी प्रलंबित नाही याबाबतचे नाहरकत प्रमाणपत्र,
o   कोणतीही थकबाकी प्रलंबित नाही याबाबतचे नाहरकत प्रमाणपत्र,
o   सभासदास परताव्याची रक्कम प्रदान होण्याबाबतचे नाहरकत प्रमाणपत्र, 
  • सदर परताव्याचे प्रस्ताव आहरण व संवितरण अधिकारी यांनी स्वाक्षरी करुन वरील नमुद जोडपत्रासह कोशागार कार्यालयास सादर करावे.

  

राश्ट्रिय निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत कर्मचारी / सभासद यांनी परताव्या प्रकरणी खालीलप्रमाणे कार्यवाही करणे अनिवार्य आहे.

  • सेवानिवृत्त होणा-या अधिकारी/ कर्मचा-यांस सेवानिवृत्तीच्या दिनांकापासून 6 महिन्याचे अगोदर परतावा Claim id बाबत मोबाईल/ई मेल वर माहिती प्राप्त झाल्याची खात्री करण्यात यावी. जर सदरचे Claim id  सभासदास प्राप्त नसल्यास कोशागाराषी संपर्क साधावे.
  • सभासदास Claim id प्राप्त झाल्यानंतर www.cra-nsdl.com या संकेतस्थळावरुन स्वतःचे PRAN Kit वरील I-Pin द्वारे प्रणालीत प्रवेष करुन “Exit withdrawal request” अंतर्गत (Initiate withdrawal request)  परताव्या बाबतची कार्यवाही सुरु करावी. 
  •  सभासदाने Initiate withdrawal request या Withdrawal type (एकमुस्त किंवा टप्प्याने) व परताव्याची टक्केवारी (Percent of withdrawal)  निवडावे.
  •  सभासदास होणा-या अंतिम प्रदान रक्कमे बाबतचा सविस्तर तपशील  PFRDA  यांचे परिपत्रक दिनांक 12.11.2015 मध्ये दिलेला आहे. 
  •  Annuity Service Provider (ASP) यांची निवड करणे तसेच ASP SCHEME OPT यांची निवड करण्याची संपूर्ण जवाबदारी हि सभासदांची राहील. या विषयी अधिक माहिती www.cra-nsdl.com या संकेतस्थळावर subscriber's  corner वर उपलब्ध आहेत.
  •  सभासदाने प्रणालीमध्ये भरलेल्या माहितीची खात्री करावी व अपूर्ण असलेली माहिती उदा. व्यवहाराचा पत्ता, बॅंकेचे खाते क्रमांक, वारसदाराची माहिती, मोबाईल क्रमांक व ई मेल आयडी इ. अद्यावत करण्याची जबाबदारी ही सभासदाची राहील.
  • सभासदाने प्रस्तावासोबत जोडण्यात येणारे आवष्यक दस्तावेज/पुरावे ऑनलाईन प्रणालीतील Checklist मध्ये þ  करावे. उदा. स्वतःचे ओळखपत्र, रहिवासी पत्ता/ पुरावा, बॅंकेचे रद्द केलेले धनादेश (Cancelled Cheque) इ.
  • वरीलप्रमाणे सभासदाने प्रणालीमार्फत परताव्याची कार्यवाही पूर्ण करुन अंतिम Submit केल्यांनतर त्याला Acknowledgement id प्राप्त होईल.
  • वरील कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर “View form and print withdrawal form”  या पर्यायामार्फत सदर नमुन्याची/प्रस्तावाची प्रिंट घ्यावी.
  •  वरील परताव्याचे नमुन्यावर सभासदाने खालील प्रमाणे कार्यवाही करणे आवष्यक आहे.

o   स्वतःचे फोटो लावून त्यावर स्वाक्षरी करणे,
o   सदर माहिती (Declaration) प्रमाणित करुन त्यावर स्वाक्षरी करावी.
o   साक्षीदाराची स्वाक्षरी घ्यावी.
o   Revenue stamp लावावे.


  •         सदर परताव्याचे प्रस्ताव आहरण व संवितरण अधिकारी यांनी स्वाक्षरी करुन कोशागार कार्यालयास सादर करावे.

No comments:

Post a Comment